Rohit Pawar | राहुल नार्वेकरानी दिलेला निकाल म्हणजे बाटली तीच, औषध फक्त नवीन

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवताना विधिमंडळ बहुमताचा विचार करावा लागेल. अजित पवार गटाकडे ५३ पैकी ४१ आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार (Ajit Pawar) यांचाच आहे. तसेच दोन्ही गटाच्या याचिका फेटाळून लावताना कोणत्याही आमदाराला अपात्र न करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिला. त्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून या निकालावर जोरदार टीका करण्यात येत आहे.

राहुल नार्वेकरांच्या या निर्णयावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी टीका केली आहे. बाटली तीच औषध फक्त नवीन…आम्ही खरं आहे ते बोललो. पण दिल्लीतून स्क्रिप्ट केली. मग हे नाटक कशाला करायचे?, असा निशाणा रोहित पवारांनी साधला.

भाजपाने पक्ष आणि कुटुंब फोडले. विधानसभा अध्यक्षांनी अन्याय करणारा निकाल दिला.ज्या व्यक्तीने घर बांधले त्या व्यक्तीला घरातून बाहेर काढल्यावर शरद पवार आता शांत बसणार नाही. पुन्हा एकदा पक्ष उभा करण्यासाठी शरद पवार आता तयार आहेत. २०२४ साली भाजपा आल्यावर संविधान राहणार नाही, असा दावाही रोहित पवारांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी अजितदादांचीच, शरद पवार यांना मोठा धक्का

Jagdish Mulik | पुणे लोकसभा निवडणुकीसाठी जगदीश मुळीकांच्या उमेदवारीची शक्यता वाढली

Surya Ghar Yojana | मोफत वीज योजनेसाठी नोंदणी झाली सुरू, असा करू शकता अर्ज