कणकवली पोलीस स्थानकात अचानक आले नितेश राणे; आणि मग…

सिंधुदुर्ग – गेल्या काही दिवसांपासून भाजपनेते निलेश राणे हे चांगलेच चर्चेत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरण चांगलेच गाजत आहे. दरम्यान, आज चौकशीसाठी आज भाजपाचे आमदार नितेश राणे हे कणकवली पोलीस स्थानकामध्ये हजर झाले.

दुपारच्या सुमारास नितेश राणेंनी कणकवली पोलीस स्थानकामध्ये आले. जवळजवळ एक तास त्यांची चौकशी सुरु होती. संतोष परब हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणेंना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्या ठिकाणी देखील त्यांना दिला मिळाला नाही आणि उच्च न्यायालयातही नितेश राणेंना जामीन नाकारला होता.

त्यानंतरआता नितेश राणेंनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणी अद्याप सुनावणी झालेली नाही. आज अचानक नितेश राणे वकील संग्राम देसाई यांच्यासह कणकवली पोलीस स्थानकामध्ये चौकशीसाठी दाखल झाले जवळपास एक तासभर नितेश राणेंची चौकशी कणकवली पोलीसांकडून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.