मलायका अरोराबरोबरच्या ब्रेकअपच्या चर्चांवर अर्जून कपूरने सोडलं मौन; अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाला…

बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अर्जुनने त्याच्या इंस्टा अकाउंटवर व्हॅकेशनमधील फोटो शेअर केले होते, ज्यात तो एकटाच दिसत होता. शिवाय या फोटोंवर मलायकाने कोणती कमेंटही केली नव्हती. तेव्हापासून दोघांचे ब्रेक झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मलायकाच्या ब्रेकअपच्या चर्चांवर आता अर्जून कपूरने मौन सोडलं आहे.

मलायकाने आंतरराष्ट्रीय श्वान दिनानिमित्त तिचा खास श्वान कॅस्परबरोबर एक क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत मलायकाने कॅपश्नमध्ये लिहंल आहे, “आंतरराष्ट्रीय श्वान दिवस. आज, उद्या आणि नेहमी साजरा करत आहे. माझा सुपरस्टार कॅस्पर.”

मलायकाच्या या पोस्टवर अर्जुन कपूरने कमेंट केली आहे. अर्जूनने कमेंटमध्ये लिहिलं आहे. हा तुझ्या आयुष्यातील खरा स्टार आहे. देखणा मुलगा. या कमेंटबरोबर त्याने हार्ट आणि फायर इमोजीही शेअर केले आहेत. अर्जुन कपूरच्या या पोस्टनंतर चाहते पुन्हा एकदा दोघांच्या नात्यावर संभ्रमात पडले आहेत.