‘या’ मतदारसंघात आता रोहितदादांचाच शब्द चालणार, थोरल्या पवारांचा मोठा निर्णय !

अहमदनगर : नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादीचा झेंडा डौलाने फडकला. यामध्ये कर्जत-जामखेडचे आमदार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या रणनीतीचा सिंहाचा वाटा होता. रोहित पवार यांनी २०१९ मध्ये कर्जत जामखेडमध्ये तत्कालीन मंत्री राम शिंदे यांचा पवार केल्यानंतर नुकत्याच झालेल्या कर्जत नगर पंचायत निवडणुकीतही रोहित पवारांनी राम शिंदेंना चितपट केले आहे. याच पार्श्ववभूमीवर शरद पवार यांनी रोहित पवार यांच्यावर मोठी जबाबदारी देण्याचे ठरवले आहे.

शरद पवार रोहित पवार यांच्यावर राज्य पातळीवरील एक मोठी जबाबदारी दिली आहे. त्याबाबत रोहित पवार यांनीच ट्वीट करुन माहिती दिली आहे. शरद पवार यांच्या सुचनेनुसार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रोहित पवार यांच्यावर भूम-परंडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा आणि पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी रोहित पवार यांच्या खांद्यावर दिली आहे.

‘आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सूचनेनुसार प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी भूम-परांडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा व पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर सोपवलीय. पक्षादेशानुसार आगामी काळात या मतदारसंघात संघटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नवे-जुने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्याने कामाच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन केला जाईल आणि या विश्वासाच्या बळावरच आगामी सर्व निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल, असा विश्वास आहे’, असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.