हे सुधरणार नाहीत! एवढ्या पाहुणचारानंतरही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षाने भारताला म्हटले ‘शत्रू देश’

Zaka Ashraf represent India as Dushman mulk: ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी (ODI World Cup 2023) सर्व संघ जवळपास भारतात पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानचा संघही (Pakistan Cricket Team In India) क्रिकेटच्या महाकुंभासाठी भारतात पोहोचला आहे.

सात वर्षांनंतर भारतात आल्यावर पाकिस्तानी खेळाडूंचे भारतीय भूमीवर जोरदार स्वागत करण्यात आले. संघ आपला पहिला सराव सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झका अश्रफ (Zaka Ashraf) यांना त्यांच्या एका विधानामुळे सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

वास्तविक झका अश्रफ पाकिस्तानी खेळाडूच्या नवीन कराराच्या संदर्भात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भारतासाठी ‘शत्रू देश’ असा शब्द वापरला. अश्रफ यांच्या या विधानावरून खळबळ उडाली असून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

व्हिडिओमध्ये अश्रफ म्हणाले, “आम्ही आमच्या खेळाडूंना हे करार प्रेमाने आणि आपुलकीने दिले आहेत. पाकिस्तानच्या इतिहासात कधीच खेळाडूंना एवढी मोठी रक्कम दिली गेली नव्हती. मी दिलेली आहे. आमचे सर्व खेळाडूंचे मनोबल उंचावले पाहिजे. उंच उडा. जेव्हा ते शत्रू देशात किंवा कोणत्याही ठिकाणी सामना खेळायला जातात तेव्हा त्यांच्यात उत्साह असला पाहिजे.’

https://youtu.be/gCfxHtR26Wo?si=MEthSTF6L7ExyINO

महत्वाच्या बातम्या-

Pune Ganeshotsav 2023 : गणपती विसर्जन मिरवणुकीत हृदयविकाराचा झटका आल्याने पुण्यात 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ?

Ganesh Visarjan 2023: पुण्यातील मानाचे कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरूवात

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा