Rohit Pawar :  सूड कसा उगवायचा याचा निर्णय…; ‘बारामती ॲग्रो’ प्रकरणी रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया 

मुंबई :   मुंबई हायकोर्टाने ‘बारामती अॅग्रो’ (Baramati Agro) या कंपनीवरील कारवाईला स्थगिती दिल्यानंतर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईस स्थगिती दिल्याबद्दल पवार यांनी हायकोर्टाचे आभार मानले. तोडफोड करून मिळवलेल्या सत्तेच्या छत्राखाली राहून सुडाचं राजकारण करणं सोपं आहे, ते करणाऱ्यांनी करत रहावं.. त्यांच्यावर सूड कसा उगवायचा याचा निर्णय निवडणुकीत जनता घेईल, असेही रोहित पवार यांनी म्हटले.

रोहित पवार म्हणाले, ‘बारामती ॲग्रॉ’ च्या प्लांटवर कारवाई करण्यास स्थगिती दिल्याबद्दल मी सर्वप्रथम मा. हाय कोर्टाचे आभार मानतो… तोडफोड करून मिळवलेल्या सत्तेच्या छत्राखाली राहून सुडाचं राजकारण करणं सोपं आहे, ते करणाऱ्यांनी करत रहावं.. त्यांच्यावर सूड कसा उगवायचा याचा निर्णय निवडणुकीत जनता घेईल…

पण यानिमित्ताने माझं त्यांना एक सांगणं आहे की, महाराष्ट्रात कधीही नव्हता तो राजकीय द्वेषाचा घाणेरडा पायंडा तुम्ही पाडताय… एका अर्थाने राजकीय द्वेषाचे बाप तुम्ही आहात, पण लोकशाहीत सामान्य जनता ही बाप असते, हे विसरू नका. त्यामुळं आज जरी तुम्ही खुशीत असलात तरी भविष्यात हेच अस्र तुमच्यावरही उलटल्याशिवाय राहणार नाही..’जिनके घर शीशे के होते हैं, वे दूसरों पर पत्थर नहीं फ़ेंका करते’ असं म्हणत सत्ताधारी पक्षाला इशारा देखील दिला आहे.

https://www.youtube.com/watch?v=sStgV_m3FeE&t=2s

महत्वाच्या बातम्या-

Mahavitaran : मीटर रीडर व वीजग्राहकामध्ये वीज बिल कमी करण्यासाठी संगनमत; गुन्हा दाखल

Ganesh Visarjan 2023: पुण्यातील मानाचे कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरूवात

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा

लोकसभेसाठी सोलापूरमधून राम सातपुते ? शेतकऱ्यांचा, युवकांचा बुलंद आवाज आता दिल्लीत घुमणार ?