World Cup 2023: एक असा खेळाडू, जो स्वबळावर टीम इंडियाला बनवू शकतो विश्वविजेता

Key Player For Indian Team: विश्वचषक 2023 सुरू (ODI World Cup 2023) होण्यास 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे, त्यामुळे विश्वचषक स्पर्धेच्या तयारीला बळकटी देण्यासाठी टीम इंडिया (Team India) उद्या गुवाहाटी येथे विश्वविजेत्या इंग्लंडविरुद्ध पहिला सराव सामना खेळणार आहे. टीम इंडियाने नुकतेच आपल्या विश्वचषक संघात मोठे बदल केले असून अक्षर पटेलच्या (Axar Patel) जागी अश्विनचा (Ravichandran Ashwin) संघात समावेश केला आहे.

आता तसं पाहिलं तर टीम इंडियाचा वर्ल्डकप संघ खूप मजबूत आणि संतुलित दिसत आहे, पण असं असूनही टीम इंडियामध्ये असा एक खेळाडू आहे, जो टीम इंडियाला कोणताही सामना स्वत:च्या बळावर जिंकवू शकतो.

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) त्याच्या फलंदाजी आणि धारदार गोलंदाजीने संघाच्या प्लेइंग 11 मध्ये चांगला संतुलन साधतो. 2019 मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्याने बॅटने चांगली कामगिरी केली होती. अशा परिस्थितीत, हार्दिकने 2019 च्या फलंदाजीसह गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करण्यास सुरुवात केली, तर तो 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियासाठी 2011 च्या विश्वचषकातील युवराज सिंगची भूमिका बजावू शकतो.

युवराज सिंगच्या (Yuvraj Singh) अष्टपैलू कामगिरीमुळे टीम इंडियाने 28 वर्षांनी 2011 मध्ये विश्वचषक जिंकला, तर हार्दिकनेही अशीच कामगिरी केली तर तो 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा टीम इंडियाला विश्वविजेता बनण्यास मदत करू शकतो.

https://youtu.be/gCfxHtR26Wo?si=MEthSTF6L7ExyINO

महत्वाच्या बातम्या-

Pune Ganeshotsav 2023 : गणपती विसर्जन मिरवणुकीत हृदयविकाराचा झटका आल्याने पुण्यात 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ?

Ganesh Visarjan 2023: पुण्यातील मानाचे कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरूवात

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा