Ram Satpute : लोकसभेसाठी सोलापूरमधून राम सातपुते ? शेतकऱ्यांचा, युवकांचा बुलंद आवाज आता दिल्लीत घुमणार ?

Ram Satpute : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. इतर सर्व पक्षांप्रमाणे भाजपने (BJP) देखील जोरदार तयारी सुरु केली मिशन 45 साठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र भाजपमधील अनेक मोठ्या चेहऱ्यांना लोकसभेचं तिकीट दिलं जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत लोकसभेच्या 48 पैकी 45 जागा जिंकण्याचं टार्गेट भाजपने ठेवलं आहे. यासाठीचंद्रपूरहून सुधीर मुनगंटीवार, जळगावच्या रावेरमधून गिरीश महाजन, सोलापूरमधून राम सातपुते, ठाण्यातून संजय केळकर(Sanjay Kelkar) किंवा रविंद्र चव्हाण(Ravindra Chavhan), आणि दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकरांना (Rahul Narvekar) तिकीट मिळण्याची शक्यता आहे.एबीपी माझाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघांत केंद्रीय मंत्री भेटी देत असून त्यामाध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद सुरू आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने 16 मतदारसंघ निवडले आहेत. त्यापैकी दहा मतदारसंघात शिवसेनेचं प्राबल्य असलेले आहेत. अजित पवार यांचा एक गत भाजप सोबत आल्याने भाजपचे काही मतदारसंघातील वजन वाढले असल्याचे दिसत आहे.शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मदतीने तसेच सर्व मित्र पक्षांना सोबत ठेवून हे मिशन पूर्ण करण्याचा भाजप प्रयत्न करणार असल्याचे दिसत आहे.

https://www.youtube.com/watch?v=sStgV_m3FeE&t=2s

महत्वाच्या बातम्या-

Mahavitaran : मीटर रीडर व वीजग्राहकामध्ये वीज बिल कमी करण्यासाठी संगनमत; गुन्हा दाखल

Ganesh Visarjan 2023: पुण्यातील मानाचे कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरूवात

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा