करारा जवाब मिलेगा : राज ठाकरेंच्या ठाण्यातल्या सभेचा नवा टीझर पाहिलात का ?

ठाणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS ) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ठाण्यात सभा १२ एप्रिल रोजी होणार आहे. राज ठाकरेंच्या या सभेचा टीझर मनसेकडून रिलीज करण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या सभेमधे राज ठाकरेंच्या भाषणावर राजकीय प्रतिक्रियांना या सभेतून उत्तर दिलं जाणार आहे. राज ठाकरेंच्या 12 एप्रिलला पार पडणाऱ्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

मनसे नेते संदिप देशपांडे (Sandeep deshpande)  यांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे. देशपांडे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शरद पवार, संजय राऊत आणि अजित पवार यांनी केलेल्या टीका आहेत. या सर्व टीकांवर राज ठाकरे ठाण्याच्या सभेत उत्तर देणार आहे. या सर्व टीकांना राज ठाकरे करारा जवाब देणार असे म्हटले आहे.