कोरोनाचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर होतोय परिणाम, Study Reportमध्ये धक्कादायक खुलासा

जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या (Covid-19) वाढत्या प्रकरणांमध्ये एक धक्कादायक अभ्यास अहवाल (Study Report) समोर आला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की कोरोनामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होत आहे. कोरोना रुग्णांवर करण्यात आलेल्या संशोधनातून असे समोर आले आहे की, कोरोनाची लागण झाल्यावर पुरुषांच्या वीर्यवर विपरित परिणाम होतो. याचा अर्थ कोरोनाचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर (Fertility In Men) परिणाम होतो.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, कोरोना संक्रमित पुरुषांच्या वीर्यांवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, संसर्ग झाल्यानंतर वीर्याचा दर्जा पूर्वीसारखा राहिला नाही. दिल्ली, पाटणा आणि मंगलगिरी एम्समध्ये हा अभ्यास करण्यात आला असून, त्यात हा नवा खुलासा समोर आला आहे. पाटणा एम्समध्ये, 2020 मध्ये, ऑक्टोबर ते एप्रिल 2021 पर्यंत, 19 ते 43 वयोगटातील 30 पुरुषांचा समावेश करण्यात आला, ज्यांना कोरोनाची लागण झाली होती.

कोरोनाचा पुरुषांच्या शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होतो
ज्या पुरुषांचे वीर्य घेण्यात आले होते, त्यांची पहिली शुक्राणूंची संख्या चाचणी संसर्ग झाल्यानंतर करण्यात आली आणि त्यानंतर अडीच महिन्यांनी या लोकांच्या वीर्याची तपासणी करण्यात आली आणि चाचणीत असे दिसून आले की, संसर्ग झालेल्या पुरुषांच्या वीर्याची गुणवत्ता अत्यंत कमकुवत आहे. पहिली चाचणी आणि जेव्हा वीर्य नमुने पुन्हा तपासले गेले तेव्हा देखील शुक्राणूंची गुणवत्ता कोरोना संसर्गापूर्वी सारखी आढळली नाही. यावरून असे दिसून येते की कोरोनाचा शुक्राणूंच्या संख्येवरही परिणाम होतो.