रुपाली चाकणकर यांना अहमदनगरमधून गेला धमकीचा फोन; आरोपी ताब्यात, ‘हे’ सांगितले कारण

पुणे – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (State Women’s Commission Chairperson Rupali Chakankar) यांना नुकतीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. महिला आयोगाच्या ऑफीसला फोन करुन रूपाली चाकणकर यांना पुढील जीवे मारू असा अज्ञाताने इशारा दिल्याने एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान,  रुपाली चाकणकर यांना धमकीचा फोन (Threat Call to Rupali Chakankar) अहमदनगर जिल्ह्यातून केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अहमदनगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथील भाऊसाहेब शिंदे (Bhausaheb Shinde) नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात (Accused Arrest from Ahmednagar) घेतले आहे. प्राथमिक चौकशीत आरोपी शिंदे याने चक्रावणारा दावा केला आहे.

काही लोकांनी सॅटेलाईटद्वारे माझ्या मेंदूचा ताबा घेतला आहे. माझ्या पत्नीलाही अशाच पद्धतीने त्रास दिला जात आहे. या बाबत तक्रार आम्ही महिला आयोगाकडे करून काही उपयोग झाला नाही. असा भलताच कांगावा आरोपीने केल्यामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत.

आता मला पोलीस संरक्षण मिळाले आहे तर मी माझी बाजू न्यायालयासमोर मांडू शकेल’ असेही या आरोपीने  म्हटले आहे. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला अटक करून न्यायालयापुढे हजर करण्याची तयारी केली आहे. त्यानंतर सखोल तपास केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.