‘देशवासियांसाठी सरकार म्हणजे आता पूर्वीसारखं मायबाप नसून ते एक सेवक झालं आहे’

नवी दिल्ली – 21 व्या शतकातील नवा आधुनिक भारत साकारण्यासाठी उज्ज्वल भावी पिढी घडवण्याचं केंद्र सरकार काम करत असून, सबका साथ सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास (Everyone’s development with everyone, everyone’s faith, everyone’s efforts) हा सरकारचा मंत्र आहे,असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल केलं. हिमाचल प्रदेशातील शिमला इथं आयोजित गरीब कल्याण संमेलनात (Garib Kalyan Sammelan) त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या देशभरातल्या लाभार्थ्यांशी दूरस्थ पद्धतीने संवाद साधला.

गरीब कल्याण आणि सुशासनासाठी केलेल्या योजनांनी सरकारची व्याख्या बदलली आहे. देशवासियांसाठी सरकार म्हणजे आता पूर्वीसारखं मायबाप नसून ते एक सेवक झालं आहे असंही ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या 11 व्या हप्त्याचं वितरण पंतप्रधानांनी केलं.या अंतर्गत 10 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात 21 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी थेट हस्तांतरित करण्यात आला.

दरम्यान, देशभरातल्या विविध राज्यांची राजधानी असलेल्या शहरात तसंच अनेक जिल्हा मुख्यालयांमधून योजनांचे लाभार्थी आणि लोकप्रतिनिधी या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीने सहभागी झाले होते. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोलापूरमधून, रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे (Ravsaheb Danve) यांनी जालना इथून, तर केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी औरंगाबादमधून या कार्यक्रमात सहभाग घेतला.