हिजाबच्या वादात पाकड्यांनी नाक खुपसलं, म्हणाले…

नवी दिल्ली : कर्नाटकात हिजाब आणि भगव्यांवरून वाद चिघळला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये मुस्कान नावाची मुलगी कॉलेजमध्ये हिजाब घालून येताना दिसत आहे. तिच्या मागे बजरंग दलाच्या काही विद्यार्थ्यांनी जय श्रीराम नावाच्या घोषणा देताना दिसत आहे. त्यानंतर त्या तरूणींनी देखील प्रत्युत्तरादाखल ‘अल्लाह अकभर’ ची घोषणा देताना व्हिडीओमध्ये ती दिसत आहे. यावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

या प्रकरणावर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्कानच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. ओवेसींनी व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, मुलीच्या आई-वडिलांना मी सलाम करतो. या मुलीने एक आदर्श ठेवला आहे. भीक मागून आणि रोखून काहीही मिळणार नाही. मुलीने अनेक दुर्बल लोकांना हा मोठा संदेश दिला आहे. या मुलीने जे काम केले आहे ते मोठे धाडसाचे काम आहे. ओवेसींना व्हिडीओमध्ये त्या मुलीला धाडसी राहण्यास सांगितले आहे.

नोबेल पुरस्कार विजेता मलाला युसुफझाईने देखील यासंदर्भात एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये तिने लिहिले आहे की, मुस्लिम मुलींना कॉलेजमध्ये हिजाब घालण्यावळ बंदी घालणे खूप भयानक आहे. कमी किंवा जास्त कपडे परिधान केल्याबद्दल महिलांवर आक्षेप घेतला जातो. भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांनावरील अत्याचार करणे थांबवावे.

पाकिस्तानची सरकारी वृत्तवाहिनी पीटीव्ही न्यूज ने म्हटलं आहे की, मुस्कान भारतात एक निषेधाचा चेहरा बनली आहे. हिजाब परिधान केल्याबद्दल कर्नाटकातील भगवा परीधान करणाऱ्यांविरोधात मुस्कान उभी राहिली आहे. ती सोशल मीडियावर आता यांच्या विरोधातील एक प्रतीक बनली आहे.