Rupali Chakankar | “बेडकाने छाती फुगवली की त्याला वाटतं आपणं बैल आहोत”, चाकणकरांचा कोल्हेंना टोला

Rupali Chakankar – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर ही टीका केली की त्यांना शिरुरमध्ये उमेदवारही मिळत नाही. याबाबत रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना विचारलं असता त्यांनी अमोल कोल्हेंना खोचक टीका करत खडेबोल सुनावले आहेत. चाकणकर यांनी त्यांना बेडकाची उपमा दिली आहे.

काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?
“बेडकाने छाती फुगवली त्याला वाटतं आपण बैल झालो असं वाटतं. उमेदवार वगैरे मिळत नाहीत अशी हास्यास्पद विधानं त्यांनी करु नयेत. कारण इतके दिवस मतदारसंघात न फिरकलेले अमोल कोल्हे आता त्यांच्या नाटकाच्या निमित्ताने लोकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वतःच्या घरासमोरचा रस्ताही त्यांना पाच वर्षात करता आला नाही. तरीही आपण मतदारसंघात आहोत असं सांगत आहेत. इतका आत्मविश्वास येतो कुठून हा प्रश्न आहेच.”अशी खोचक टीका चाकणकर यांनी केलीय.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांची धक्काबुक्की महाराष्ट्राला लाज आणणारी: Nana Patole

Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, काळे झेंडेही दाखवले

Muralidhar Mohol | मोहोळांनीही उघडले लोकसभेचे पत्ते; म्हणाले, ‘मी लोकसभेची तयारी करतोय, पण…’