आधी राज्यपालांना पाकिस्तानात पाठवा, नंतर बाकीचं बघू – रुपाली पाटील 

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांचा अपमान हा कळीचा मुद्दा बनला आहे. यातच आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या एक वक्तव्य सध्या चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय. आपण जाणीवपुर्वक छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक संभाजी महाराज म्हणतो. काही जण धर्मवीर म्हणतात. राजे धर्मवीर नव्हते, असं अजित पवारांनी (Ajit Pawar)  म्हटले आहे.

छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्यरक्षक म्हणतो, काही जण मात्र धर्मवीर म्हणतात. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. संभाजी महाराजांनी कधीच कुठे धर्माचा पुरस्कार केला नाही. शिवाजी महाराजांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. यावर काही जण जाणीवपूर्वक धर्मवीर असे म्हणतात. मी मंत्रिमंडळात असताना, निर्णय घेताना सगळ्यांना सांगायचो की, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज असा उल्लेख आपण करावा, असे अजित पवार म्हणाले.(Ajit Pawar’s controversial statement regarding Dharamveer Sambhaji Maharaj).

दरम्यान, आता यावरून भाजप नेते नरेंद्र पवार यांनी अजित पवारांना लक्ष केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या अजित पवारांना पाकिस्तानात पाठवून द्या, असं वक्तव्य भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केलंय. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ज्या नेत्याला माहित नाही, ते महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, त्यांची रवानगी पाकिस्तानात केली पाहिजे, असं वक्तव्य नरेंद्र पवार यांनी केलंय.

दरम्यान, नरेंद्र पवार यांच्या त्या प्रतिक्रियेवर बोलताना राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी बोलताना राज्यपालांना छत्रपती शिवाजी महाराज, महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य केले होते, त्यावेळी हे भाजपचे नेते कुठे गेले होते, आधी राज्यपालांना पाकिस्तानात पाठवा,नंतर बाकीचं बघू असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.