नितेश राणे भाजपाचे नाच्या? राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची भाजप आमदारावर जहरी टीका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे नेहमी एकमेकांवर हल्लाबोल करत असतात. आता पुन्हा एकदा हे दोन नेते आमने सामने आले आहेत. नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांची नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्याशी तुलना केली आहे. नितेश राणेंनी संजय राऊत महाविकासआघाडीचे गौतमी पाटील असल्याचं म्हणत टीका केली. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thomabre) यांनी राणेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

गौतमी पाटील हि स्वत:च्या व्यवसायासाठी काम करतेय. सुरवातीला तिच्या काही चुका होत्या त्या आपण सांगितल्या, परंतु अशा पद्धतीने तुम्हाला महिलांना हिणवण्याचा अधिकार कुणी दिला? असा प्रश्न रुपाली पाटील यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, नितेश राणे हे जर संजय राऊत याना महाविकास आघाडीचा नाच्या म्हणत असतील, तर नितेश राणे म्हणजे टिल्लू भाऊ तुम्ही भाजपचे नाच्या आहात का ? असा खोचक टोला पाटील यांनी लगावला आहे.