‘पाटलीण’ हायेस… रुबाबात नाच; मराठी अभिनेत्याकडून नृत्यांगणा गौतमी पाटीलची पाठराखण

'पाटलीण' हायेस... रुबाबात नाच; मराठी अभिनेत्याकडून नृत्यांगणा गौतमी पाटीलची पाठराखण

नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या आडनावाविषयी (Gautami Patil Surname) नवी माहिती समोर आली आहे. गौतमीच्या आडनावावरून पुण्यात चक्क बैठक पार पडली आहे. “गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. गौतमीनं पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही,” असा इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जराड पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे गौतमीच्या आडनावावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

त्यावर गौतमी पाटील हिने आपल्या प्रतिक्रियेद्वारे आपण मागे हटणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. गौतमीच्या या भूमिकेवरुन तिच्यावर टीकाही होत आहे आणि काही लोक तिच्या समर्थनार्थही बोलच आहेत. अशातच आता अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी फेसबुक पोस्ट करत गौतमीला पाठिंबा दिला आहे.

किरण माने यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी…

“एक छोटीशी चिमणीसुद्धा आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिव करते रे…” गौतम बुद्धांनी अंबठ्ठाला सांगीतलेलं हे वाक्य हे भारतीय साहित्यातलं नितांतसुंदर आणि आशयघन वाक्य आहे असं आ.ह. साळुंखे तात्या नेहमी म्हणतात. आपल्या संविधानातल्या ‘स्वातंत्र्य’ या मुल्याचं इतकं समर्पक स्पष्टीकरण दुसरीकडे कुठे क्वचितच सापडेल.

चिमणीला सुद्धा स्वत:च्या मनाप्रमाणं चिवचिवण्याची मुभा आहे… आपण तर माणूस आहोत. आपल्याला असं व्यक्त होण्याचं, मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य का मिळू नये??? एखाद्यानं काय बोलायचं… कसं वागायचं… स्वत:च्या घरात काय खायचं… कसले कपडे घालायचे… यावर बंधनं आणण्याचे प्रकार सुरू आहेतच… पण आता कळस झालाय. एका मुलीने पोटापाण्यासाठी काय करावं? किती पैसे घ्यावेत?? इथंपासून ते आता, तिनं कुठलं आडनांव लावावं??? यासाठी सुद्धा दुसरंच कुणीतरी जबरदस्ती करत आसंल… धमक्या देत आसंल तर हे लै म्हंजे लैच संतापजनक आणि लाजीरवाणं हाय.

गौतमी, जेव्हा तू चुकली होतीस, तुझ्या व्हल्गर हातवार्यांवर गदारोळ उठला होता, तेव्हा तू माफी मागीतली होतीस… पुन्हा ती चूक होणार नाही याची जाणीवपूर्वक काळजी घेतलीस. खरंतर त्यानंतरच तू लोकप्रियतेच्या पायर्या चढू लागलीस. आज तू जे करतेस त्यात आता ‘बिभत्स’ असं काहीही नाही. परफाॅर्मन्स करताना अंगभर कपडे असतात. तू ज्या अदाकार्या करतेस त्यावर ग्रामीण भागातली तरूण पोरं जीव ओवाळून टाकतात.. तुझ्या क्षेत्रात अशी लोकप्रियता लाखात एखादीला लाभते. तुझा डान्स हा उच्च दर्जाचा आहे की नाही, याविषयी प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं आणि त्या प्रत्येक मताचा आदर आहे… पण तरीही कुणीही हे नाकारू शकत नाही,की आजच्या तरूणाईमध्ये तुझी जबरदस्स्त ‘क्रेझ’ आहे.. तुझ्या स्टेजवरच्या फक्त एंट्रीनं तरूणाई पागल होते.. गांवखेड्यांत तू लोकप्रियतेचा कळस गाठला आहेस. तिथे मराठी सिनेमा-सिरीयलमधल्या टाॅपच्या अभिनेत्रींपेक्षा तू पाॅप्यूलर आहेस. तू हे यश एंजाॅय कर. बर्याचदा अशा यशाचा काळ छोटा असतो. जोवर आहे तोवर धमाल कर. तुझ्यात जिद्द आणि चिकाटी असेल तर याहूनही मोठे यश मिळवशील पुढे जाऊन. पण ‘आम्हाला वाटतंय तसंच तू वागावंस, तस्संच नाचावंस आणि आम्ही सांगतोय तेच नांव लावायचंस’ असं दरडावू पहाणार्यांना उंच उंच लांब उडवून लाव.

आज तरी तू आमच्या ग्रामीण भागातल्या मनोरंजनक्षेत्रातली ‘पाटलीण’ हायेस… रुबाबात नाच, बिनधास्त नाच !

Previous Post
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी उपाययोजना करा; दिपक केसरकर यांच्या शिक्षण विभागाला सूचना

विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी उपाययोजना करा; दिपक केसरकर यांच्या शिक्षण विभागाला सूचना

Next Post
नितेश राणे भाजपाचे नाच्या? राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची भाजप आमदारावर जहरी टीका

नितेश राणे भाजपाचे नाच्या? राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची भाजप आमदारावर जहरी टीका

Related Posts
200 रुपयांपेक्षा कमी स्वस्त जिओ रिचार्ज, दररोज 1GB डेटा, अमर्यादित कॉल आणि विनामूल्य ऑफर

200 रुपयांपेक्षा कमी स्वस्त जिओ रिचार्ज, दररोज 1GB डेटा, अमर्यादित कॉल आणि विनामूल्य ऑफर

Reliance Jio Recharge : रिलायन्स जिओकडे (Reliance Jio) ग्राहकांच्या गरजांसाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन (my jio recharge plan) आहेत. रिलायन्स…
Read More
RCB playoffs | सेलिब्रेशन तर बनतेच..! आरसीबीच्या चमत्कारिक विजयानंतर चाहत्यांना आनंद गगनात मावेना, पाहा Video

RCB playoffs | सेलिब्रेशन तर बनतेच..! आरसीबीच्या चमत्कारिक विजयानंतर चाहत्यांना आनंद गगनात मावेना, पाहा Video

RCB playoffs | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शनिवारी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा 27 धावांनी पराभव करून चाहत्यांचा दिवस गाजवला.…
Read More
मोशीतील इंटरनॅशनल मल्टिपर्पज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ‘दृष्टीक्षेपात’, महेश लांडगेंचा आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प | Mahesh Landge

मोशीतील इंटरनॅशनल मल्टिपर्पज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ‘दृष्टीक्षेपात’, महेश लांडगेंचा आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प | Mahesh Landge

Mahesh Landge | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून मोशी येथे आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी…
Read More