‘या’ वटवृक्षाच्या सावलीत मी महाविकास आघाडीत स्थिरावणार; रुपाली पाटील करणार राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तडकाफडकी रामराम करून पुण्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या रुपाली पाटील ठोंबरे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याविषयी गेल्या दोन दिवसांपासून उलटसुलट चर्चा होती. त्या चर्चेला रुपाली पाटील यांनी आज पूर्णविराम दिला. एक खास ट्वीट करत रुपाली पाटील यांनी आपल्या पुढील राजकीय प्रवासाची दिशा जाहीर केली आहे.

आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‛हात’ नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‛पाय’ दिसत नाहीत ; हो म्हणूनच ठरलंय ! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार असल्याचे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

राज ठाकरेंना भावनिक पत्र‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील मी माझ्या सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. पण जरी मी राजीनामा देत असले तरी तुम्ही माझ्या कायम हृदयात रहाल. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देतं. यापुढेही आपले आशीर्वाद रहावेत”, असं भावनिक पत्र रुपाली पाटील यांनी राज ठाकरे यांना लिहिलं आहे.