आमचा लोकशाहीवर विश्वास, कांदोळकरांवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी – घाडी

म्हापसा : गोवा विधानसभा निवडणुकीत बार्देश मधून सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या मतदार संघातून आता आणखी एक धक्कादायक आणि तेवढीच संतापजनक अशी बातमी समोर येत आहे. या मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर हे मतदारांना आमिष दाखवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

काल खोर्ली येथे कांदोळकर हे मतदारांनाआमिष दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत विरोधकांनी तक्रार दाखल केली आहे. यावेळी दोन्ही बाजूंचे लोक पोलीस स्थानकात दाखल झाल्याने चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला. या सर्व प्रकारामुळे आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून कांदोळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करू लागले आहेत.

प्रचार आठ वाजता प्रकार संपतो मग १० वाजता कांदोळकर हे हे या भागात काय करत होते हा सवाल भाजयुमोचे नेते ऋषिकेश घाडी यांनी केला आहे. आम्ही त्याठिकाणी गेलो तेव्हा याबाबत त्यांना जाब विचारला असता कांदोळकर यांनी दादागिरी सुरु केली यानंतर वाद झाला. आम्ही पोलिसात तक्रार दाखल केली असून एफआयआर देखील झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. आमचा लोकशाहीवर विश्वास असून निवडणूक आयोग तसेच पोलीस प्रशासन योग्य ती पावले उचलेल हीच आशा आहे असं घाडी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, खरतर स्वाभिमानी मतदारांना धनशक्तीच्या जोरावर विकत घेवू पाहणाऱ्या अशा नेत्यांना मतदारांनीच अद्दल घडवली पाहिजे. स्वतःचे काही कर्तुत्व नसल्याने आता कांदोळकर हे पैशांचे आमिष मतदारांना दाखवून निवडून येण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र अश्या लबाड नेत्याची जागा विधानसभेत नसून जेलमध्ये आहे अशी टीका देखील आता भाजपकडून होऊ लागली आहे.