म्हापशात काँग्रेसचा ‘रात्रीस खेळ चाले’ ; स्वाभिमानी मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न ?

म्हापसा : गोवा विधानसभेच्या निवडणुकांसाठी प्रचाराला वेग आला आहे. भाजपा, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षांचे धुरंधर नेते ठिकठिकाणी प्रचार बैठकांमधून मतदारांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. येत्या 14 तारखेला गोव्यामध्ये निवडणुका होणार आहेत. सत्तारुढ भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस यांनी या निवडणुकीत संपूर्ण बहुमत मिळण्याचा दावा केला आहे.

दरम्यान, गोवा विधानसभा निवडणुकीत बार्देश मधून सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या मतदार संघातून आता आणखी एक धक्कादायक आणि तेवढीच संतापजनक अशी बातमी समोर येत आहे. या मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर हे मतदारांना आमिष दाखवत असल्याचा प्रकार समोर आला आहे. काल खोर्ली येथे कांदोळकर हे मतदारांनाआमिष दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत विरोधकांनी तक्रार दाखल केली आहे. यावेळी दोन्ही बाजूंचे लोक पोलीस स्थानकात दाखल झाल्याने चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला.

या सर्व प्रकारामुळे आता कॉंग्रेसवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून कांदोळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करू लागले आहेत. स्वाभिमानी मतदारांना धनशक्तीच्या जोरावर विकत घेवू पाहणाऱ्या कांदोळकर यांना मतदारांनीच अद्दल घडवावी असे आवाहन भाजपकडून केले जात आहे.

आमचा लोकशाहीवर विश्वास असून निवडणूक आयोग तसेच पोलीस प्रशासन योग्य ती पावले उचलेल हीच आशा आहे. स्वतःचे काही कर्तुत्व नसल्याने आता कांदोळकर हे पैशांचे आमिष मतदारांना दाखवून निवडून येण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र अश्या लबाड नेत्याची जागा विधानसभेत नसून जेलमध्ये आहे अशी टीका देखील आता भाजपकडून होऊ लागली आहे.