Pune News | बाळासाहेब रामचंद्र ठोंबरे यांना श्री स्वामी समर्थ सेवा पुरस्कार प्रदान

Pune News : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट पालखी पादुका दर्शन सोहळ्यात स्वामी भक्त बाळासाहेब रामचंद्र ठोंबरे यांना श्री स्वामी समर्थ सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे यंदा ८ वे वर्ष होते.

पुणे  (Pune News) महानगरपालिकेजवळील कॉंग्रेस भवन येथे ३ दिवसीय उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होते. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी श्री स्वामी समर्थ सेवा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, पुनीत बालन ग्रुपचे पुनीत बालन, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोटचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, संगीता ठोंबरे, अण्णा थोरात, विनायक घाटे, विजय काजळे, नामदेवराव मोहिते, राजाभाऊ वरखडे, विलास चव्हाण उपस्थित होते. पालखी सोहळ्याचे यंदा २७ वे वर्ष आहे.

हर्षद कुलकर्णी यांचा ‘स्वामी भक्ती गीते’ तसेच श्री साई नवनाथ भजनी मंडळ, गुरुवर्य साईभक्त बाळासाहेब परदेशी ग्रुप भजन आणि साई भक्त गजेंद्र परदेशी व सहकलाकार यांच्या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. मुकुंद बादरायणी यांचा ‘स्वर समर्थ अभंगवाणी’ तर योगेश तपस्वी आणि सहकारी यांचा ‘स्वामीगीत सुगंध’ कार्यक्रम उत्सवादरम्यान झाला. उत्सवात सर्व दिवस रक्तदान महायज्ञ हा उपक्रम राबविण्यात आला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

समृद्धी महामार्गावर भलामोठा खड्डा, दीड वर्षातच समृद्धी महामार्गाच्या कामाचे पितळ उघडे पडले

Republican Party | आगामी निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा संकल्प

भोई समाजातील सर्व पोट जातींनी एकत्र येऊन काम करावे – Chhagan Bhujbal