सावरकर नावाची दहशत वाढली पाहिजे, सावरकरप्रेमी आलाय म्हटल्यावर घाबरले पाहिजेत – पोंक्षे

पुणे – अभिनेते शरद पोक्षे (Actor Sharad Ponkshe) हे वारंवार वादग्रस्त वक्तव्ये केल्याने चर्चेत येत असतात आज देखील त्यांनी असेच एक वक्तव्य केले आहे. सावरकर (Savarkar) नावाची दहशत वाढली पाहिजे, सावरकरप्रेमी आलाय म्हटल्यावर घाबरले पाहिजेत, आता यापुढे चित्र बदललं पाहिजे. असं त्यांनी म्हटलं आहे.

पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटी’चे (डीईएस) मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्यावतीने ‘मृत्युंजयी स्वातंत्र्यवीर सावरकर’ नृत्य, नाट्य, संगीत आणि अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना शरद पोंक्षे  यांनी हे वक्तव्य केले आहे.

जेव्हा ८० टक्के हिंदुंना दुखवायचं असले, ८० टक्के हिंदुंचं मानसिक खच्चीकरण (Mental retardation) करायचं असेल, तर एकाच माणसावर चिखलफेक करा ८० टक्के हिंदू समाज (Hindu society) दुखावतो इतकी सावरकर नावाची दहशत आहे. ब्रिटिशांना होती, काँग्रेसला होती आजही आहे आणि ही दहशत वाढली पाहिजे. सावरकर नावाची दहशत वाढली पाहिजे, सावरकरप्रेमी आलाय म्हटल्यावर घाबरले पाहिजेत. आता यापुढे चित्र बदललं पाहिजे. असं मत  पोंक्षे यांनी व्यक्त केलं आहे.