वाढलेल्या यूरिक अॅसिडवर नियंत्रण ठेवण्यासाठी कांदा आहे प्रभावी 

पुणे –  युरिक ऍसिड (Uric acid) असलेल्या रुग्णांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी. या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनी त्या पदार्थांचे सेवन टाळावे, ज्यामध्ये प्युरीनचे प्रमाण जास्त असते त्यामुळे युरिक अॅसिड नियंत्रणात राहते. शरीरात यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढले तर त्याचा थेट परिणाम शरीराच्या अनेक भागांवर होऊ लागतो. त्यामुळे वाढलेल्या युरिक अॅसिडवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्ही औषधांव्यतिरिक्त काही घरगुती उपाय (Home Remedies) देखील करू शकता.

कांद्यामध्ये (onions) फोलेट, मॅग्नेशियम, फॉस्फरस यांसारख्या अनेक पोषक घटक असतात. यासोबतच यात अँटी-ऑक्सिडंट्स (Anti-oxidants) आणि अँटी-इंफ्लेमेटरी (Anti-inflammatory) गुणधर्म देखील असतात. हे सर्व गुणधर्म युरिक ऍसिड नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहेत. कांद्याचा वापर जेवणात केला नाही तर अन्न अपूर्ण वाटते. अशा परिस्थितीत कांदा खाण्यात काय भूमिका निभावतो याची कल्पना येऊ शकते. पण या सगळ्या व्यतिरिक्त, तुम्हाला माहिती आहे का की, आरोग्यासाठी जेवणाची चव वाढवण्यासोबतच, वाढलेल्या यूरिक अॅसिडवर नियंत्रण ठेवण्यासाठीही कांदा प्रभावी आहे ?

होय, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कांद्यामध्ये मेटाबॉलिज्म (Metabolism) असते, ज्यामुळे यूरिक अॅसिड नियंत्रित राहण्यास मदत होते. कच्चा कांदा वाढलेल्या यूरिक अॅसिडवर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. या आजाराने त्रस्त असलेले रुग्ण सॅलडच्या रूपात याचे सेवन करू शकतात. याशिवाय तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कांद्याचा रस (Onion juice) पिऊ शकता. याचा फायदा तुम्हाला मिळेल.