सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी; इतर 109 कर्मचाऱ्यांबाबत न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय 

मुंबई – जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar House Protest) यांच्या घरावर झालेल्या आंदोलनाप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना 11 एप्रिल म्हणजेच दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर 109 एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. किला कोर्टात याबाबत आज सुनावली झाली.

काल, शुक्रवारी रात्री अॅड. गुणरत्न सदावर्तेंना अटक केल्यानंतर आज त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. दरम्यान, या प्रकरणी आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षाकडून करण्यात आली होती. तर गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte Police Custody) हे हल्ला झाला त्यावेळी हजर नसल्याने त्यांचा हल्ल्यात सहभाग नव्हता यामुळे त्यांना जामीन द्या, अशी मागणी आरापींच्यावतीने करण्यात आली होती.

नेमकं काय आहे प्रकरण ?
आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी काल अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी शरद पवार यांच्या निवासस्थानी जोरदार राडा पाहायला मिळाला. यावेळी आंदोलनकांनी पवार यांच्या घरावर चप्पलफेक, दगडफेक केली असा आरोप आहे.  या हल्ल्यासाठी सदावर्ते जबाबदार असल्याचा ठपका त्यांच्यावर आहे.