गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची होणार उचलबांगडी? 

 मुंबई – जेष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांच्या घरासमोर झालेल्या आंदोलनचे कालपासून राजकीय पडसाद पडत आहेत. अनेकांनी गृह विभागावर टीका केली असून विरोधकांसह सत्ताधारी सुद्धा पोलीस प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत आहेत. यातच आता शरद पवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home minister) यांना बोलवून घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांची उलचलबांगडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी काल ‘सिल्व्हर ओक’ वर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर राज्य सरकारची आणि पोलिसांची नाचक्की झाली. त्यानंतर गृहखाते संभाळणाऱ्या वळसे-पाटील यांचे अपयश असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनीही सरकारने बुळबुळीत भूमिका घेणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पवार यांनी तातडीने गृहमंत्री वळसे-पाटील यांना बोलावून घेतल्याने त्यांची उचलबांगडी होणार अशी चर्चा सुरु झाली आहे.झी २४ तास या वृत्त वाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना ‘हा हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचं अपयश आहे’, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.  पोलिसांना हे आधी कसं कळलं नाही. तिथे जाणारे आंदोलक मीडियाला घेऊन पोहचले. अर्थात मीडियाचे हे कामच आहे की जे आहे ते दाखवणं. मग मीडियाला जे कळलं ते पोलीस यंत्रणेला का कळलं नाही. एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकवण्यात आली. पोलीस विभाग यामागच्या सूत्रधाराचा शोध घेतील.’असं ते म्हणाले.