Safari Park | ‘अकबर’ आणि ‘सीता’ नावाच्या सिंह-सिंहिणीचे प्रकरण न्यायालयात; जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण

Safari Park : कोलकाता (Kolkata) येथील बंगाली सफारी पार्कमध्ये (Safari Park) सिंह-सिंहिणीची (lion-lioness ) जोडी सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनली आहे. 12 फेब्रुवारी रोजी या सिंह-सिंहिणीच्या जोडीला त्रिपुरातील विशालगड येथील प्राणी संग्रहालयातून बंगाल सफारी पार्कमध्ये आणण्यात आले. पण सफारी पार्कमध्ये आणलेल्या सिंहिणीचे नाव सीता (Sita), तर वाघाचे नाव अकबर (Akbar) असे असल्याने वाद निर्माण झाला आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांनी सिंहिणीला सीतेचे नाव देण्यावर तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. याच कारणामुळे सिंहिणीचे नाव बदलण्यासाठी विहिंपतर्फे शुक्रवारी याचिका दाखल करण्यात आली आहे. कोलकाता उच्च न्यायालयात (High Court) राज्याविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

विश्व हिंदू परिषदेने यासंदर्भात सांगितले की, दोन्ही वाघाच्या जोडप्यांना त्रिपुराहून बंगाल सफारी पार्कमध्ये आणण्यात आले आहे. अधिकृत कागदपत्रांमध्ये त्यांची नावे पँथर नर आणि मादी अशी लिहिली होती. त्याला ओळखपत्र क्रमांकही दिला होता. मात्र बंगालमध्ये आल्यानंतर वाघ आणि वाघिणीची नावे बदलण्यात आली.

यावर भाजप चे वकील तरुणज्योती तिवारी म्हणाले की, ममता बॅनर्जी यांनी नेहमीच हिंदू धर्माविरोधात अशा गोष्टी केल्या आहेत. या राज्यात दुर्गापूजेसाठी उच्च न्यायालयात जावे लागते. हा प्रकार कोणी केला असेल, त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Lok Sabha Elections | भाजपचे आजपासून राष्ट्रीय अधिवेशन; लोकसभा निवडणुकीचा रोडमॅप तयार

Rooftop Solar Scheme | घराच्या छतावर सोलर पॅनेल लावायचे आहेत? बँका गृहकर्ज देऊन वित्तपुरवठा करणार आहेत

‘भाजपामुळे राज्याची संस्कृती बिघडली, चिखलफेकीसाठी टोळ्या भाड्याने…’; चिपळूणच्या राड्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया