Video: सचिन तेंडुलकरने कुटुंबासह घेतले मुकेश अंबानींच्या घरी बाप्पाचे दर्शन!

Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीचा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो. जो प्रत्येक भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीच्या दिवशी साजरा केला जातो आणि या वर्षी तो आज म्हणजेच 19 सप्टेंबर 2023, मंगळवारी साजरा केला जाईल. हा 10 दिवसांचा गणोत्सव देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण आपापल्या घरी गणपतीचे स्वागत करतात आणि त्याची मूर्ती बसवतात.

देशाचे सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरी अँटालियामध्ये देखील बाप्पाचं आगमन झालंय. त्यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर सहकुटुंब गेला. सचिन तेंडूलकर, त्याची पत्नी अंजली तेंडूलकर, मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन हेदेखील गणपतीच्या दर्शनाला गेले होते.

महत्त्वाच्या बातम्या-
Anand Mahindra : आनंद महिंद्रांकडून भारतीय गोलंदाज सिराजसाठी पाठवली ग्रेटभेट

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही फूट नाही! शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांची नवी दिल्लीत भेट

राज ठाकरे जेव्हा मुकेश अंबानी यांच्या घरी पोहोचतात, भेटीमागचं कारण तर आहे अतिशय खास