सलमान खानला साप चावला, उपचारानंतर घरी सोडलं

पनवेल : अभिनेता सलमान खान(Salman Khan)ला सापानं दंश केलाय. पनवेलच्या फार्महाऊसमधली ही खळबळजनक घटना आहे. यानंतर त्याला रात्री 3 .30 वाजता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. MGM हॉस्पिटलमध्ये तो दाखल होता. दरम्यान आता त्याला घरी सोडण्यात आलंय.

सलमान खानचा उद्या वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी तो पनवेलच्या फार्महाऊसवर गेला होता. याच फार्महाऊसवर सलमानला सर्पदंश झाला आहे. काल रात्री २ ते ३ च्यावेळी ही घटना घडल्याचे बोललं जात आहे.

त्यानंतर त्याच्यावर कामोठेजवळील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचारानंतर सलमान हा घरी परतला आहे. हा साप विषारी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. सलमानला डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो पुन्हा त्या फार्महाऊसवर परतला आहे.