Samantha आणि नागा चैतन्य पुन्हा आले एकत्र? अभिनेत्रीच्या ‘त्या’ टॅट्यूमुळे सत्य आले समोर

Samantha And Naga Chaitanya: साउथ इंडस्ट्रीतील (South Film Industry) चर्चित जोडप्यांपैकी एक असलेले समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांनी घटस्फोट घेत त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला. त्यानंतर नागा चैतन्य दुसऱ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्याही काही दिवस चर्चा झाल्या. यानंतर आता मात्र समंथा आणि नागा पुन्हा एकत्र आल्याचे समजत आहे. काही दिवसांपूर्वी नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. दोघांनी फ्रेंचडॉगसोबत काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

दोघांचा एकत्र फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना नागा आणि समांथा पॅचअप झाल्याचं वाटायला लागलं. आता सामंथाने या अफवेला पूर्णविराम दिला आहे. समंथाने नागाच्या नावाचा टॅटू काढून टाकला आहे. समंथा हिने तिच्या बरगड्यांवर नागा चैतन्य याच्या टोपणनावाचं टॅटू काढला होता. नागा चैतन्य याच्यासोबत असताना अभिनेत्री शारीरावर टॅटू काढला होता.

अभिनेत्री पहिल्या पतीच्या नावाचे टॅटू काढून टाकले आहेत. समंथा ‘सिटाडेल’च्या प्रमोशनसाठी लंडन याठिकाणी गेली होती. अशात अभिनेत्रीने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये टॅटू दिसत नसल्यामुळे नागा चैतन्य – समंथा रुथ प्रभू यांच्या एकत्र आल्याच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

व्हायब्रंट गुजरात समिटबाबत महाराष्ट्र सरकारचा मौन का ? शरद पवार गटाचा थेट सवाल

‘नागिन’ फेम अभिनेत्रीवर मोठा आघात; Israel-Hamas युद्धात कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू

हमासच्या दहशतवादाचे समर्थन करण्याची काँग्रेसची भूमिका उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का?