रोहितचे शतक आणि बुमराहचा विकेट्सचा ‘चौकार’; भारताचा अफगाणिस्तानवर शानदार विजय

INDvsAFG World Cup Highlights: आज (११ ऑक्टोबर) भारत विरुद्ध अफगाणिस्तान (India vs Afghanistan) संघात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर विश्वचषक सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानवर ८ विकेट्सने सोपा विजय मिळवला. हा भारताचा विश्वचषक २०२३मधील सलग दुसरा विजय आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हे या सामना विजयाचे शिल्पकार राहिले.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने निर्धारित ५० षटकात ८ बाद २७२ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून कर्णधार हशमदुल्लाह शहिदीने सर्वाधिक ८० धावा केल्या. तर अझमतुल्लाहनेही ६० धावांचे योगदान दिले. मात्र भारतीय गोलंदाज बुमराहने या डावात सर्वांचे लक्ष वेधले. १० षटके फेकताना बुमराहने अवघ्या ३९ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. शिवाय हार्दिक पंड्यानेही २ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

अफगाणिस्तानच्या २७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून हिटमॅन रोहित शर्माने शतकी तडाखा लगावला. ८४ चेंडूत ५ षटकात आणि १६ चौकारांच्या मदतीने त्याने १३१ धावा फलकावर लावल्या. तसेच विराट कोहलीने नाबाद ५५ धावा करत संघाच्या विजयात योगदान दिले. भारताने ३५ षटकातच २ विकेट्सच्या नुकसानावर सामना खिशात घातला.

 

महत्वाच्या बातम्या-

व्हायब्रंट गुजरात समिटबाबत महाराष्ट्र सरकारचा मौन का ? शरद पवार गटाचा थेट सवाल

‘नागिन’ फेम अभिनेत्रीवर मोठा आघात; Israel-Hamas युद्धात कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू

हमासच्या दहशतवादाचे समर्थन करण्याची काँग्रेसची भूमिका उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का?