‘मटण करीं’ना छत्रपतीं बद्दल बोलण्याचा अधिकारच नाही; मनसेने उडवली मिटकरी यांची खिल्ली

 मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात. आज त्यांनी यांनी शिवजयंती तिथीनुसार साजरी करण्यावर आक्षेप घेतला आहे. शिवजयंती तारखेनुसार साजरी व्हावी, असं त्यांनी म्हटलंय. तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यामागे राजकारण असल्याचा जावईशोध मिटकरी यांनी लावला आहे.

दरम्यान, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मिटकरी यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले,  जो पक्ष दाऊद च्या माणसांना विमानातून फिरवतो, ज्यांचा मंत्री दाऊद ला पैसे पुरवतो, ज्यांचा आदर्शच दाऊद आहे त्या मटण करीं ना छत्रपतीं बद्दल बोलण्याचा अधिकारच नाही.असं देशपांडे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी देखील मिटकरींचे कां टोचले आहेत. ते म्हणाले, “अमोल मिटकरी यांना विनंती आहे की तुम्ही गोंधळ निर्माण करू नका. शासनाने जन्मतारीख शोधून काढली त्यानुसार शासन शिवजयंती साजरी करेल. पण शिवजयंती तिथीनुसार साजरी करावी, अशी शिवप्रेमींची भावना आहे. त्याप्रमाणे ते साजरे करत आहेत. तुम्ही संभ्रम निर्माण करू नका”, असं खासदार विनायक राऊत म्हणालेत.