परळीत पंकजाताईंच्या स्वागताची जय्यत तयारी, ढोल-ताशांच्या गजरात जेसिबीतून फुलांची उधळण

Pankaja Munde Welcome In Parli: भाजपा व मित्रपक्षाच्या बीड लोकसभेच्या उमेदवार, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Panakja Munde) यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उद्या दिनांक 24 मार्च रोजी प्रथमच परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये आगमन होणार आहे. लाडक्या लेकीच्या स्वागतासाठी विधानसभा मतदारसंघ सज्ज झाला असून त्यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागताची तयारी करण्यात आली आहे. पंकजाताई मुंडे या प्रथम लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होणार आहेत. कौठळी तांडा येथील होळी महोत्सवात सहभाग घेतल्यानंतर त्यांचे थाटात परळी शहरात आगमन होणार आहे. ढोल ताशांच्या गजरांमध्ये त्यांच्यावर जेसीबी मधून फुलाची उधळण केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

बीड लोकसभेतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजाताई मुंडे प्रथमच परळी शहरात येत आहेत. याबद्दल नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे. पंकजाताई मुंडे यांचे सकाळी 10 वाजता परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये आगमन होणार आहे. तपोवन शिरसाळा येथील स्वागत नंतर पांगरी चौकामध्ये सकाळी 11 वाजता त्यांचे शानदार स्वागत केले जाणार आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या गोपीनाथ गडावरील समाधीस्थळी नतमस्तक होऊन त्या कौठळी तांडा येथील होळीच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणार आहेत. त्यानंतर त्यांचे परळीमध्ये आगमन होणार आहे.

इटके कॉर्नर, एक मिनार चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. ढोल ताशांच्या गजरामध्ये त्यांचे स्वागत केले जाणार असून जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर फुलांची उधळण केली जाणार आहे.

भव्य कमानी, आकर्षक कटआउट्सने परळी शहर सजले
पंकजाताई मुंडे यांच्या स्वागतासाठी परळी नगरी सज्ज झाली आहे ठिकठिकाणी भव्य दिव्य कमानी उभारण्यात आल्या आहेत तर शहरात ठिकठिकाणी पंकजा मुंडे यांचे आकर्षक कटआउट्स लावण्यात आले आहेत. पंकजाताई मुंडे यांच्या स्वागतासाठी नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये ही कमालीची उत्सुकता दिसून येत आहे.

भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे या प्रथमच परळी विधानसभा मतदार संघात येणार असून यानिमित्त होणाऱ्या स्वागत कार्यक्रमाला ठिकठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना रिपाई व मित्र पक्षांच्या वतीने करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांच्या विजयासाठी मेधा कुलकर्णींनी कसली कंबर

Rohit Pawar | शासकीय आश्रम शाळेत दूध घोटाळा; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल

Sharad Pawar | केजरीवालांच्या अटकेची किंमत भाजपला मोजावी लागणार