Sanjay Raut | निवडणुका घेऊन दाखवाव्यात मग जोर कोणाच्यात आहे, हे दाखवून देऊ

Sanjay Raut- शिवसेनेचे नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कोल्हापूर येथील महाअधिवेशनात उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे विधान केले होते. या विधानावर आता उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भूमिका व्यक्त केली आहे.यावेळी देखील राऊत यांनी भडक वक्तव्ये करत चर्चेत राहण्याचा प्रयत्न केले आहे.

“मातोश्रीवर बाळासाहेबांच्या खोलीत अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली होती. तिथे भाजपाचे इतरही नेते होते. मात्र एकनाथ शिंदे हे पूर्णपणे भाजपाचे नोकर झाले आहेत, त्यांच्या सर्वांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ते असे बेताल वक्तव्य आहेत”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

खोट्या शिवसेनेच्या अधिवेशनात मोदींना पंतप्रधान करण्याचा ठराव मंजूर होतो. भाजपाचे अभिनंदनाचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनात होतो… काय ही लाचारी. जर आज बाळासाहेब ठाकरे आज असते तर यांचा कडेलोट केला असता. शिंदे सेनेत जोर असेल तर त्यांनी मुंबई, ठाण्याच्या निवडणुका घेऊन दाखवाव्यात मग जोर कोणाच्यात आहे, हे दाखवून देऊ, असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले.

महत्वाच्या बातम्या

Lok Sabha Elections | भाजपचे आजपासून राष्ट्रीय अधिवेशन; लोकसभा निवडणुकीचा रोडमॅप तयार

Rooftop Solar Scheme | घराच्या छतावर सोलर पॅनेल लावायचे आहेत? बँका गृहकर्ज देऊन वित्तपुरवठा करणार आहेत

‘भाजपामुळे राज्याची संस्कृती बिघडली, चिखलफेकीसाठी टोळ्या भाड्याने…’; चिपळूणच्या राड्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया