भारतीय जनता पक्षाकडून आपण वापरले जातो हे काही लोकांना उशिरा कळतं  – राऊत

मुंबई – गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा अखेर स्थगित झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. मात्र, पुण्यातील सभा होणार असून मनसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राज यांनी ट्वीटमध्ये केले आहे.

राज यांची तब्बेत ठीक नसल्याने दौरा रद्द करण्यात आल्याचं सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आलंय. पुण्यातील सभेमध्ये आपण यावर सविस्तर बोलणार असल्याचं राज यांनी स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे हे अचानक पुणे दौऱ्यावर मुंबईला परतल्यापासूनच त्यांच्या अयोध्या दौऱ्याबद्दल (Ayodhya Tour) चर्चांना उधाण आलं होतं. अखेर आज या चर्चांना पूर्णविराम देत राज यांनी दौरा स्थगित (Tour postponed) झाल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलंय.

या पार्श्वभूमीवर हा दौरा स्थगित झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यावरून राज ठाकरेंना खोचक शब्दांत नाव न घेता टोला लगावला आहे.  इतर पक्षाचे काही कार्यक्रम तिथे होते पण त्यांनी ते रद्द केले हे माध्यमांकडून मला समजलं. आम्ही त्यांना सहकार्य केलं असतं. शेवटी अयोध्या आहे. शिवसेनेला (Shivsena)  मानणारा फार मोठा वर्ग अयोध्येत आहे. असं कळलं की ते जात नाहीत, असं राऊत म्हणाले तसंच भारतीय जनता पक्षाने (BJP) असं त्यांच्या बाबतीत का करावं. भारतीय जनता पक्षाकडून आपण वापरले जातो हे काही लोकांना उशिरा कळतं, असासुद्धा टोला राऊत यांनी हाणला आहे.