नाफेडमार्फत तुर खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू

यवतमाळ : हंगाम 2021-22 मध्ये आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेड मार्फत तुर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी दिंनाक 20 डिसेंबर 2021 पासून सुरु करण्यात आली आहे.

महाराष्ट्र स्टेट को. ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. मार्फत जिल्ह्यात 7 खरेदी केंद्र उघडण्यात आले आहे. यात महागाव तालुक्यात तालुका खरेदी विक्री समिती, महागाव, पांढरकवडा तालुक्यात तालुका खरेदी विक्री समिती पांढरकवडा, झरी तालुक्यात बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रीया सहकारी संस्था पाटण, पुसद तालुक्यात किसान मार्केट यार्ड शेलु (बु), आर्णी तालुक्यात शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपूर, दिग्रस तालुक्यात तालुका खरेदी विक्री समिती दिग्रस, आणि बाभुळगाव तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती बाभुळगाव या खरेदी केंद्रांचा समावेश आहे.

तरी दिलेल्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी करणेसाठी आपले आधार कार्ड, शेतीचा 7/12, पिकपेरा व बॅक खाते पासबुक इ. संपुर्ण माहिती देवून तुर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी अर्चना माळवे यांनी कळविले आहे.