‘आज काश्मीर मध्ये जे घडतंय ते जर इतर पक्षाच्या राजवटीत हे झालं असतं तर भाजपाने देशभर गोंधळ घातला असता’

मुंबई – काश्मीरमध्ये गेल्या २० दिवसांत आठ हत्या झाल्या आहेत. ज्यामध्ये काश्मिरी पंडित (Kashmiri Pandit) आणि स्थलांतरित हिंदूंचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात टार्गेट किलिंगच्या (Target killing) माध्यमातून बिगर काश्मिरी आणि काश्मिरी पंडितांना लक्ष्य केले आहे.

काश्मीरमधील एका कुटुंबाचे अश्रू सुकण्यापूर्वीच आणखी एका हल्ल्याची बातमी येते. दहशतवादी उघडपणे लोकांना मारून दहशत पसरवत आहेत, पण केंद्रातील सरकारला याची कोणतीही चिंता नसल्याचे दिसत आहे. सरकारला जाग आणण्यासाठी आणखी किती निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागतील? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

१९९० च्या दशकात जशी परिस्थिती होती तशीच परिस्थिती आज काश्मीरमध्ये निर्माण झाली आहे. भाजपने काश्मिरी पंडितांना खोऱ्यात परत आणण्याबद्दल वाचन दिले होते आणि हिंदुत्वाच्या नावावर मते मिळवली. मात्र आता जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करूनही लोकांच्या जीवनात कोणतीही सुधारणा झालेली नाही.असचं दिसून येत आहे.

दरम्यान, काश्मीरमधील हत्यासत्रावरून शिवसेना नेते संजय राऊत (sanjay Raut) यांनी भाजपवर टीका केली आहे. लोकांना शोधून मारलं जात आहे. सरकारकडून सुरक्षेची कोणतीही व्यवस्था करण्याता आलेली नाही. लोकांचं स्थलांतर आणि पलायन सुरू आहे. जर इतर पक्षाच्या राजवटीत हे झालं असतं तर भाजपाने काश्मिरी पंडित, हिंत्वाच्या नावे संपूर्ण देशभर गोंधळ घातला असता. पण गृहमंत्री, पंतप्रधान, जम्मू काश्मीरमध्ये राज्य तुमचे असतानाही काश्मिरी पंडित जीव गमावत आहेत किंवा पलायन करत आहेत हे भयानक आहे.