संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या नेमकं आज कोर्टात काय झालं ?

Mumbai – एक हजार कोटींहून अधिक रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना 31 जुलैला मध्यरात्री अटक केली. त्यांना आज दुसऱ्यांदा पीएमएलए कोर्टात हजर केले असता त्यांना 8 ऑगस्टपर्यंत कोर्टाने ईडीची कोठडी ​​​​​सुनावली. राऊतांचा कोठडीतील मुक्काम मिळाला असून त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

पत्राचाळ पुनर्विकास घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे फ्रंट मॅन म्हणून कार्यरत होते. संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्यानेच प्रवीण यांनी म्हाडाकडून आवश्यक त्या मंजुरी मिळवल्या. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात प्रवीण यांनी अवैधरीत्या मिळवलेल्या ११२ कोटी रुपयांपैकी १ कोटी ६ लाख रुपये संजय राऊत व त्यांच्या कुटुंबीयांकडे थेट गेले असल्याचे आत्तापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. ही रक्कम आणखीही असू शकते, असा दावा ईडीने कोर्टात केला आहे.