अमृता फडणवीस खरच सुंदर आहेत की त्यांनी प्लास्टीक सर्जरी केली आहे? त्यांनीच दिलं उत्तर..

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कायमच त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. राजकारण, गायन आणि सामाजिक विषय अशा सर्वच विषयांमध्ये अमृता फडणवीस यांनी केलेली वक्तव्यं ही चर्चेचा विषय ठरतात. अमृता यांनी नुकतीच ‘झी मराठी वाहिनी’वरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना अनेक मजेशीर प्रश्न विचारण्यात आले. त्यावर अमृता फडणवीस यांनीही आपल्या नेहमीच्या बिनधास्त शैलीत उत्तरे देत जोरदार बॅटिंग केली.

यावेळी त्यांना तुम्ही प्लास्टिक सर्जरी (Plastic surgery) केली का असाही प्रश्न विचारण्यात आला होता. याचं उत्तर देताना अमृता म्हणाल्या की, बरं झालं तुम्ही मला हा प्रश्न विचारलात. मला यावरुन अनेक लोक सोशल मीडियावर ट्रोल (Trolls on social media) करतात. प्लास्टिक सर्जरी ही खूप महागडी गोष्ट आहे. त्यामध्ये मोठा धोकाही असतो. काहीही बिघडलं तर तुमच्या चेहऱ्याची सगळी फिचर्स बिघडू शकतात. मी लग्नापूर्वी एकदाही ब्युटी पार्लरमध्ये गेले नव्हते. फक्त लग्नाच्यावेळी जो मेकअप करतात, तेवढाच मी केला होता. देवेंद्रजी यांच्यासाठी माझा चेहरा महत्त्वाचा नाही. ते स्त्रीचा चेहरा नाही तर तिचं मन पाहतात. अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.