तिने काय-काय लफडी केली हे…; संजय शिरसाट यांची सुषमा अंधारेंवर टीका 

 मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेतून सातत्याने शिंदे गटावर टीका करत आहेत. मात्र आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंवर खोचक टीका केली आहे. ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. पण, तिने काय-काय लफडी केली आहे, हे तिलाच माहीत, असे विधान त्यांनी केले.

आम्ही आमची ३८ वर्षे शिवसेनेसाठी घालवली. आता तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत. ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. मात्र तिने काय-काय लफडी केली आहे, हे तिलाच माहित. अरे पण तू आहे तरी कोण? असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

अंबादास दानवे यांनी मला फोन केला होता. म्हणाले, ती बाई डोक्याच्यावर झाली आहे, असा गौप्यस्फोटही शिरसाट यांनी केला. कोणीही आजकाल सोशल मीडियावर कॉमेट करतं. आम्हाला गद्दार… गद्दार म्हणतंय… अरे घरात बघ काय चाललंय. मग आमच्यावर टीका कर, असा टोला त्यांनी लगावला.