Sanju Samson Century: संजूचे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झुंजार शतक, टीकाकारांची तोंडं केली बंद!

Sanju Samson Century: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा फलंदाज संजू सॅमसनची दमदार खेळी पाहायला मिळाली. पर्ल ग्राउंडवर झालेल्या दोन्ही संघांमधील सामन्यात त्याने दडपणाखाली चांगली कामगिरी करत संघाला 296 धावांपर्यंत मजल मारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने आफ्रिकन गोलंदाजांचा समाचार घेत शानदार शतक झळकावले. हे त्याचे वनडे आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक होते.

दक्षिण आफ्रिका आणि भारत (IND vs SA) यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना पर्ल येथील बोलंड पार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. नाणेफेक जिंकल्यानंतर एडन मार्करामने टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले, त्यानंतर टिळक वर्मा आणि संजू सॅमसनच्या दमदार खेळीमुळे भारताने 296 धावा फलकावर लावल्या.

टिळक वर्मा आणि संजू सॅमसन तुफानी खेळी करत संघाला चांगली धावसंख्या मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. टिळक वर्माने 77 चेंडूत पाच चौकार आणि एक षटकार मारत 52 धावा केल्या. दुसरीकडे, संजू सॅमसनने 108 धावा केल्या. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. या खेळीनंतर संजू सॅमसनचे सोशल मीडियावर भरपूर कौतुक होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात श्रीराम अक्षता कलशाचे पूजन; पुणेकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती

Sunrisers Hyderabad Full Squad: सनरायझर्स हैदराबाद पूर्ण संघ,यंदा पॅट कमिन्सपासून हे खेळाडू संघाचा भाग बनले