डोळ्यात अश्रू.. न्याय मिळण्याची आस.. ऑलिम्पिक पदविजेत्या साक्षी मलिकचा कुस्ती सोडण्याचा निर्णय

Sakshi Malik Retired From Wrestling: साक्षी मलिकने डोळ्यात अश्रू आणत कुस्तीतून संन्यास घेतला. माजी WFI प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांचे सहकारी संजय सिंग WFI चे अध्यक्ष झाल्यानंतर तिने हा निर्णय घेतला. संजय सिंगच्या निवडीमुळे ती चांगलीच नाराज दिसत होती. आम्ही महिला अध्यक्षाची मागणी केली होती, असे तिने पत्रकार परिषदेत सांगितले. जर महिला WFI च्या अध्यक्ष असतील तर कुस्तीपटूंचा कोणत्याही प्रकारचा छळ होणार नाही.

साक्षी मलिक म्हणाली की, आम्ही लढलो, पण यश मिळालं नाही. जर डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांचे व्यावसायिक भागीदार झाले तर मी आतापासून माझी कुस्ती सोडेन. आता तुम्हाला मी कधीच सराव करताना दिसणार नाहीस. असे बोलताना साक्षीच्या डोळ्यांत अश्रू तरळले. यावेळी कुस्तीपटू बजरंग पुनिया तिचे सांत्वन करताना दिसला.

साक्षी म्हणाली की, पूर्वी महिलांचा सहभाग नव्हता. आज ही यादी पाहिली तर एकाही महिलेला पद देण्यात आले नाही. आम्ही सर्व शक्तीनिशी लढलो, पण हा लढा सुरूच राहणार आहे. नव्या पिढीतील पैलवानांना लढावे लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात श्रीराम अक्षता कलशाचे पूजन; पुणेकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती

Sunrisers Hyderabad Full Squad: सनरायझर्स हैदराबाद पूर्ण संघ,यंदा पॅट कमिन्सपासून हे खेळाडू संघाचा भाग बनले