CWG, Sanket Sargar Wins Medal : सांगलीच्या संकेत सरगरने वेटलिफ्टिंगमध्ये जिंकलं रौप्यपदक

Birmingham-  संकेत सरगरने कॉमनवेल्थ गेम्स 2022 (CWG 2022)मध्ये भारतासाठी चमकदार कामगिरी केली आणि वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकले. (Sanket Sargar Wins Medal) संकेतने ५५ किलो वेटलिफ्टिंग  इलेव्हनमध्ये ही कामगिरी केली. संकेतने स्नॅचमध्ये 113 किलो वजन उचलले. क्लीन अँड जर्कमध्ये 135 किलो वजन उचलताना. मलेशियाच्या बिन कासदान मोहम्मदने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

क्लीन अँड जर्कमध्ये त्याने 142 किलो वजन उचलले.बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यापासून संकेत हुकला. क्लीन अँड जर्कच्या तिसऱ्या प्रयत्नात त्याला किरकोळ दुखापत झाली. त्यामुळे तो सुवर्णपदकापासून वंचित राहिला. संकेतने स्नॅचमध्ये 113 किलो वजन उचलले. क्लीन अँड जर्कच्या पहिल्याच प्रयत्नात १३५ किलो वजन उचलले. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नात त्याला यश मिळू शकले नाही.संकेतच्या रौप्य पदक जिंकल्यानंतर देशातील सर्व सेलिब्रिटी त्याचे अभिनंदन करत आहेत.

या संदर्भात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही संकेतचे अभिनंदन केले. बिर्ला म्हणाले,  संकेतच्या यशाने देशात उत्साह निर्माण झाला आहे. खेळाच्या दुसऱ्याच दिवशी हे पदक इतर खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल.दरम्यान, संकेत महाराष्ट्राच्या सांगलीचा आहे. संकेतने इथवर पोहोचण्यासाठी बरीच मेहनत केली आहे. संकेत महादेव सरगर कोल्हापुरच्या शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. मागच्या महिन्यात तो नॅशनल आणि खेलो इंडियन यूथ गेम्स मध्ये भाग घेण्यासाठी भुवनेश्वरला गेला होता. त्यावेळी वजन जास्त असल्यामुळे त्याच स्पर्धेत सहभागी होणं कठीण दिसत होतं. 55 किलो गटात उतरणाऱ्या संकेतच वजन 1.7 किलोने जास्ती होतं.