संजय राऊत यांच्या पाठीमागे हात धुवून सोमय्या  लागले; भाजप नेत्याने थेट पोलीस ठाणे गाठले 

मुंबई  : शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) आज वाकोला पोलीस ठाण्यात दाखल झाले. सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून फोनवरील संभाषणाची एक ऑडिओ क्पिल व्हायरल होतेय. या ऑडिओक्लिपमध्ये एक व्यक्ती महिलेला शिवीगाळ करताना दिसत आहे. या ऑडिओक्लिपमधला आवाज हा संजय राऊत यांचाच असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.

दरम्यान,  पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि राऊतांवर कारवाई व्हावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. या मागणीसाठीच त्यांनी आज वाकोला पोलीस ठाण्यात जावून आपली भूमिका मांडली. दरम्यान, ही कथित ऑडिओ क्लिप (An audio clip of Sanjay Raut)  खासदार आणि नेते संजय राऊत यांचीच  असल्याचा आरोप एक महिला करत आहे. या टेपमध्ये ७० सेकंदात २५ पेक्षा जास्त शिव्या ऐकू येत आहेत.