Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वांद्रे निवासस्थानी जाऊन घेतली सलमान खानची भेट

CM Eknath Shinde Meets Salman Khan | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे स्थित गेलेक्सी अपार्टमेंट या निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेतली. यावेळी सलमान खान याचे वडील ज्येष्ठ पटकथाकार सलीम खान हेदेखील उपस्थित होते.

या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी सलमान आणि त्याच्या कुटूंबियांना त्यांच्या संपूर्ण सुरक्षिततेची हमी दिली. तसेच त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याचेही सांगितले. सलमान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराचा घटनेनंतर दोनच दिवसात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने यातील दोन आरोपींना अटक केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी खान कुटूंबियांची भेट घेऊन त्यांना झालेल्या कारवाईची माहिती दिली तसेच त्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण हमी दिली.

यावेळी माजी आमदार बाबा सिद्दीकी, आमदार झिशान सिद्दीकी आणि युवासेनेचे राहुल कनाल हेदेखील उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | भावनिक न होता देशाच्या भवितव्यासाठी महायुतीला मतदान करा; माजी सैनिकांच्या मेळाव्यात अजित पवारांचे आवाहन

Shivajirao Adhalrao Patil | “जनतेच्या प्रेमाची कळवळ म्हणून मी राजकारणात”, आढळराव पाटलांनी व्यक्त केल्या भावना

Ravindra Dhangekar | पुण्याच्या विकासापेक्षा धंगेकरांसाठी टिका टिपण्णी महत्त्वाची; व्हिजनच्या नावानेही बोंबाबोंब