“मोदी पुन्हा पंतप्रधान न झाल्यास भर चौकात फाशी घेईन”, शिंदे गटाच्या आमदाराचं मोठं वक्तव्य

Santosh Bangar On Narendra Modi : महाराष्ट्र विधानसभेतील शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी नरेंद्र मोदी 2024 मध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान (PM Narendra Modi) होणार असल्याची घोषणा केली आहे. तसे न झाल्यास चौकात फासावर लटकण्याची त्यांची तयारी आहे.

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी आता फाशीबाबत वक्तव्य केले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या (MLA Disqualification Case) खटल्याचा निकाल देताना आम्हीच खरी शिवसेना असल्याच्या शिंदे यांच्या दाव्याला पुष्टी दिली.
या निकालानंतर हिंगोलीत एकनाथ शिंदे समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी बोलताना संतोष बांगर म्हणाले की, मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाहीत तर मी चौकातच गळफास घेईन.

शिवसेनेचे आमदार संतोष बांगर म्हणाले, “मी तुम्हाला आजही सांगतो… आता एप्रिलमध्ये लोकसभेची निवडणूक येत असताना, मी जड अंत:करणाने सांगतो की नरेंद्रभाई मोदी या देशाचे पंतप्रधान असतील.” संतोष बांगर यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात भरपूर चर्चा होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

MLA Disqualification Case Verdict : आम्हाला उध्दव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे – प्रकाश आंबेडकर

MLA Disqualification Case : शिंदे गटाकडून आनंदोत्सव, ठाकरे गटाचे आंदोलन

बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरेंनी गमावली; शिंदेंचा गट हीच खरी शिवसेना

उलटतपासणीला न येणं ठाकरेंना पडलं महागात; नार्वेकरांनी दाखवून दिली चूक