उलटतपासणीला न येणं ठाकरेंना पडलं महागात; नार्वेकरांनी दाखवून दिली चूक 

Shivsena MLA Disqualification Case Verdict  : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar) जाहीर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या जनतेला आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाची उत्सुकता लागली होती. पण आता याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

या निकालानुसार पक्षप्रमुखाचाच निर्णय अंतिम हा ठाकरे गटाचा दावा फेटाळण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्याला पदावरून हटवू शकत नाहीत, असं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे. पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं हे लोकशाहीला घातक आहे. असं झालं तर पक्षाला कुणीच पक्षप्रमुखाविरोधात बोलू शकणार नाही. शिवसेनेच्या घटनेत राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम आहे, असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेना पक्ष प्रमुखांना कोणालाही पक्षातून काढण्याचे अधिकार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेतेपदावरून हटवण्याचा अधिकार नाही. राष्ट्रीय कार्यकारणीशी चर्चा करूनच पक्षातून काढण्याचा निर्णय घेता येऊ शकतो. 23 जानेवारी 2018 रोजी पक्षात निवडणुका झाल्या नाहीत. असे निरीक्षण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोंदवले.

आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल वाचून दाखवताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं की, 2018 ची घटना ग्राह्य धरा ही ठाकरे गटाची मागणी अमान्य करण्यात आली आहे. तर उलटतपासणीला न आल्यामुळे ठाकरे गटाचं प्रतिज्ञापत्र अमान्य आहे. तसेच 2018 साली ठाकरे गटाने केलेली दुरुस्ती ही चुकीची असल्याचेही नार्वेकरांनी म्हटलं आहे.