गावात लसीकरणाचा टक्का घसरल्यास सरपंच-सदस्यांना गमवावी लागणारे पदे?

सोलापूर – लसीकरणाचा भारताने 100 कोटींचा टप्पा पार केलमात्र अजूनही ग्रामीण भागात लसीकरणाचा टप्पा अतिशय कमी असल्याने, कोरोनाचा धोका पुन्हा येऊ शकतो. याची शक्यता पाहून सोलापूर जिल्हा प्रशासनाने लसीकरणासाठी तीन दिवसाचा मेगा कॅम्प आयोजित केला आहे. लसीकरणाला चालना मिळण्यासाठी सोलापुरचे जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी परिपत्रक काढत गाव-खेड्यातील सरपंच आणि सदस्यांना तंबी दिली आहे. गावात लसीकरणाचा टक्का घसरल्यास सरपंच आणि सदस्यांना आपली पदे गमावावी लागतील, असं परिपत्रक काढण्यात आलं आहे.

ग्रामीण भागात या लसीकरणाला स्थानिक ग्रामपंचायतीची साथ मिळत नसेल, तर अशा गावातील सरपंच, सदस्य यांची पदे रद्द केली जातील, असे लेखी पत्र देण्यात आले आहे. मात्र साथीच्या रोगामध्ये प्रशासनाला जे अधिकार दिले आहेत त्याच अधिकारानुसार हा आदेश काढल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले. स्वामी म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिल्या डोस घेतलेल्यांचा टक्का 65 आहे तर दुसऱ्या डोसचे केवळ 20 टक्के एवढेच लसीकरण झाले आहे.  जिल्ह्यातील 77 ग्रामपंचायतीचं 100 टक्के लसीकरण पूर्ण झालं आहे. म्हणजे आणखी खूप ग्रामपंचायतीचं लसीकरण बाकी आहे.

जेव्हा आम्ही जिल्ह्यातील लसीकरणाचा आढावा घेतल्यानंतर असं समोर आलं की, काही गावांमध्ये लसीकरणाला ग्रामपंचायती सहकार्य करीत नाहीत. पदाधिकारी, सरपंच आणि सदस्य पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे लसीकरण मंदावलं आहे. त्यामुळे ग्रामपंचायत अधिनियमानुसार कमल 45 मधील तरतुदीनुसार, साथीच्या रोगांमध्ये ग्रामपंचायतीनं पावले उचलायला हवीत. ग्रामपंचायतीकडून ही पावले उचलली जात नाहीत. कलम 39 नुसार ग्रामपंचयतीच्या सदस्यावर अशा वेळी कारवायी होउ शकते.

त्यानुसार परिपत्रक काढण्यात आल्याचं, स्वामी यांनी सांगितलं.  दरम्यान, राज्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या घटते आहेच, शिवाय रूग्ण बरे होण्याची टक्केवारीही वाढते आहे. काल संपलेल्या चोवीस तासात राज्यात एक हजार 338 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली. तर एक हजार 584 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रूग्ण बरे होण्याचा दर 97 .55 टक्के झाले आहे. सध्या राज्यात 1 लाख 68 हजार कोरोनाबाधित रूग्ण गृहविलगीकरणात आहेत तर 908 कोरोनाबाधित रूग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात काल 36 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्युची नोंद झाली, राज्यातील मृत्युदर 2.12 टक्के एवढा झाला आहे.