लग्नाच्या ४ वर्षांनंतर राहुल महाजनांनी तिसऱ्या पत्नीला दिला घटस्फोट? आहेत नव्या प्रेमाच्या शोधात

Rahul Mahajan Divorce: अनेक रिअॅलिटी शोचा स्पर्धक राहिलेला राहुल महाजन (Rahul Mahajan) त्याच्या पत्नीपासून घटस्फोट घेत आहे. त्याने कझाकिस्तानची मॉडेल नताल्या इलिनासोबत (Natalya Iliana) लग्न केले होते आणि आता दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. ‘इटाईम’च्या वृत्तानुसार, चार वर्षे विवाहित जीवन जगल्यानंतर या जोडप्याने गेल्या वर्षी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. आता एका सूत्राने याला दुजोरा दिला आहे.

या जोडप्याच्या जवळच्या सूत्राने ‘इटाईम्स’ला सांगितले की, ‘सुरुवातीपासून दोघांमध्ये अनेक वाद होते. तथापि, त्यांनी शक्य तितके त्यांच्या संसाराचा गाडा ओढला. गेल्या वर्षी ते वेगळे झाले आणि घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. या जोडप्याने गेल्या वर्षी कागदपत्रे दाखल केली होती, घटस्फोट झाला आहे की अद्याप प्रक्रिया सुरू आहे हे स्पष्ट नाही.

दरम्यान नताल्या ही राहुलची तिसरी पत्नी होती. यापूर्वी 2006-2008 मध्ये श्वेता सिंगसोबत आणि नंतर डिम्पी गांगुलीशी लग्न केले होते, ज्याची भेट ‘राहुल दुल्हनिया ले जायेगा’ या रिअॅलिटी शोमध्ये झाली होती. डिम्पी आणि राहुलने 2010 मध्ये लग्न केले आणि 2015 मध्ये वेगळे झाले.