यूट्यूब-गुगलवरुन सुचली कल्पना, ‘या’ फळांची शेती करत महिला शेतकरी वर्षाकाठी कमावतेय ५ लाख

शेतीमध्ये नवीन पिके व तंत्रे आल्यानंतर नफा वाढला आहे. महिलाही शेतीत रस घेऊ लागल्या आहेत. मिर्झापूर येथील रहिवासी असलेल्या वंदना सिंग या ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit) आणि स्ट्रॉबेरीची (Strawberry) लागवड करून भरपूर नफा कमावत आहेत. वंदना सिंहच्या म्हणण्यानुसार, त्या गुगल आणि यूट्यूबच्या मदतीने शेती करायला शिकल्या.

यावर्षी त्यांना 5 लाखांचा नफा झाला
वंदना सिंग यांनी अर्ध्या एकरात ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. यातून त्यांना यावर्षी 5 लाखांचा नफा झाला आहे. याशिवाय स्ट्रॉबेरीच्या शेतीत हात आजमावून त्यांना चांगला नफा मिळत आहे. ड्रॅगन फ्रूट आणि स्ट्रॉबेरीच्या लागवडीत पहिल्या-दुसऱ्या वर्षी कमी नफा मिळतो, मात्र तिसऱ्या वर्षी हा नफा अनेक पटींनी वाढतो, असे वंदना सिंह सांगतात. त्या ड्रॅगन फ्रूटची रोपे 50 रुपयांना विकतात. याशिवाय त्याची फळे 400 रुपये किलो दराने विकली जातात.

शेतीची कल्पना कुठून आली?
शेतकरी वंदना सिंह सांगतात की, ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्याची कल्पना त्यांना यूट्यूबवरून सुचली. चुल आणि मुलांपर्यंत मर्यादित न राहता स्वतंत्रपणे शेती करूनही महिला आता स्वावलंबी होऊ शकतात, हे त्यांनी दाखवून दिले. ड्रॅगन फ्रूटसह उर्वरित जमिनीवर स्ट्रॉबेरी आणि हळद यांची लागवड केली जाते, त्यातूनही भरपूर नफा मिळतो.

वंदना सिंग यांना गौरविण्यात आले 
वंदना सिंह यांना या कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले आहे. त्याय आपल्या परिसरातील महिलांसाठी तसेच इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. जिद्द असेल तर कोणत्याही कामात यश मिळू शकते याचा पुरावा वंदना सिंग यांची मेहनत आहे.