सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अनोख्या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना ‘हर घर तिरंगा’साठी प्रोत्साहित करणार 

पुणे : भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. आपण या अमृत महोत्सवाचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत. हे वर्ष जितके ऐतिहासिक, गौरवपूर्ण, देशासाठी जितके महत्वपूर्ण आहे, देशदेखील तितक्याच भव्यतेने आणि उत्साहाने हे वर्ष साजरे करेल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) अनोख्या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना ‘हर घर तिरंगा’ साठी प्रोत्साहित करत आहे.

राष्ट्रभक्तीची भावना प्रखरपणे महाविद्यालयीन तरुणांमध्ये निर्माण व्हावी म्हणुन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येत्या १५ ऑगस्टला आपल्या लाडक्या तिरंग्यासाठी “Largest Online Album of People Holding National Flag” हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करतंय. गिनीज बुक रेकॉर्डमध्ये (Guinness World Records) ध्वजासोबतच्या १५०००० फोटोंच्या विश्वविक्रमाची नोंद होतेय.

यासाठी, आज (9 ऑगस्ट) पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने एक लाख राष्ट्रध्वजांचे वितरण उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्याहस्ते करून मोहिमेचा शुभारंभ होईल. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची सांगता होईल.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जागतिक विक्रमासाठी ध्वजासह दि. 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत फोटो पाठवता येणार. पुणे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील रासेयोच्या 3 हजार महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा यात सहभाग राहणार आहे.